क्षितिजावरची दिवाळी - शेवटच्या चाकावरून
आज कार्तिक पौर्णिमा - त्रिपुरारी पौर्णिमा - गुरु नानकदेव जयंती
२३ नोव्हेंबर २०१८ च्या रात्री म्हणजे ख्ररतर पौर्णिमा आज सकाळी तिथीने संपल्या वर सुट्टी मुळे तसेच लागून तीन दिवस प्रशासकीय सुट्ट्या मुळे आज सर्वत्र दिवाळीच्या पर्वाची अंत्यंत उल्हासात सांगता होत आहे.
सोशल माध्यमे खास करून व्हाट्स अप वर प्रत्येक सणाच्या शुभेच्छाचा पाऊस येतो, कधी कधी असा प्रश्न पडतो कि एवढे सण अथवा दिन विशेष साजरे करतो का ? अथवा करत होतो का ? असो
दिवाळीत एक खास पण मनाला विचार करणारा एक संदेश बघण्यात आला....
लहानपणी दिवाळीतील बंदूक मिळवण्याचे स्वप्न बघत होतो...
आणि
आत्ता खरी बंदूक हातात आहे तर दिवाळी साजरे करण्याचे स्वप्न बघतो
सैनिक, निमलष्करी दल, पोलीस आम्ही ओपन लाईन तसेच रनिंग स्टाफ रेल्वेवाले हे सगळे क्षितिजा वरील दिवाळीचे मानकरी !
आज पौर्णिमेच्या रात्री देखील गाडी भरधाव जात असताना दूर क्षितिजा वर विविध शहरातील आणि उपनगरातील आकाशात उडणारी नयनरम्य विविध रंगी रोषणाई खरतर दिवाळीचा रंग खऱ्या अर्थाने द्विगुणित करते. जे रोषणाई उडवत असतात त्यांना कदाचित मान वरती करून आणि अंगावर येणार नाही ना अग्नी वर्षाव म्हणून भीतीने बघावे लागत असेल ती रोषणाई पण आम्ही ती छान वाढत जाणाऱ्या गारव्यात दूरवर बघू शकतो हे खरे दिवाळीचे सुख ! त्यातही क्षितिजावरील दिवाळीचे !
वैद्यकीय क्षेत्रातील शस्त्रक्रिया विभाग, झालेच तर बाजार पेठ भागातील विक्रेते, दुकानदार तसेच छोटे मोठे कामगार ह्या सगळ्यांची दिवाळी अशीच असते, खरंतर दिवाळी साठी हजारो हात मश्गुल होऊन काम करत असतात.
आज दूरचित्रवाहिन्यांवरील विविध शहरातील त्रिपुरारीच्या यात्रा, जत्रा आणि दीपोत्सव तर कुठे रथोत्सव बघितले आणि जाणवले कि कधी हा सण जितक्या लांबवरून शांत पणे न्याहाळावा तितका सुंदर दिसतो.
यंदा दिवाळीतील विविध दिवस तिथी प्रमाणे वेगवेगळ्या दिवशी आले त्या मुळे रेल्वे आणि परिवहन क्षेत्रात आणि इतर अत्यावश्यक क्षेत्रात दिवाळी शांतपणे आणि उल्हासात पार पडली
भारत भू प्रदेशा वर साजरी होणारी दिवाळी इतर सर्व धर्मीय सणांसारखी सर्व देशात साजरी होऊ लागली आणि कधी समाज माध्यमे ह्या सणांना खूपच कीर्तिमान करतात.
आजचा देवळावरील दीपोत्सव आणि त्याचा आनंद केवळ आम्हा क्षितिजावरील दिवाळीच्या मानकऱ्यांनाच नाही तर सर्व समाज घटकांच्या जीवनात आनंद आणि प्रकाश देत राहो हीच त्रिपुरारी पौर्णिमेला प्रार्थना !
(“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)
Displayed at FB on 23rd November 2018
No comments:
Post a Comment