Thursday, 13 June 2019

मोरपीस


Image may contain: 1 person


मोरपीस


मोरपीस असते प्रत्येकाच्या मनात, हळुवार स्पर्श करणारे प्रेमाचा, आपुलकीचा, मायेचा, ममतेचा अन् सुखाचा क्षण घेऊन हळुवार मनाला फुलवणारे !!

अनुभवलेला एक हळुवार प्रेमळ क्षण पुन्हा उल्लेखुनच नाही तर मनातून ओठांच्या वर ही आणून चालत नाही, त्याचे मोरपीस हे मनाच्या गाभ्यात ठेवावे लागते.

बघा, जानकी निसर्ग कन्या भूमीतून निर्माण झालेली, तिच्या मनात राज्या रोहणाच्या वेळी मनात फुललेले मोरपीस मंथरेच्या नजरेत भरले अन् त्या निसर्ग कन्येला वनवास भोगावा लागला.

पुन्हा रामायणात राम राज्य सुरू झाले अन् जानकीला मात्तृत्वाच्या ममतेचे मोरपीस मनी फुलले अन् लोकापवादाच्या नजरेने, अग्नी परीक्षेतून तावून सुलाखून निघालेल्या निष्कलंक जानकी ला पुन्हा वनात जाणे भाग पडले.

क्षणभर मोहित करणारे मोरपीस कायम मनाच्या तळाशी ठेवूनच ह्या विश्वात वावरावे लागते.

मोरपीस शोभते ते फक्त कान्हाच्या शिरीच !

© रविंद्र गांगल

चित्र सौजन्य : इंटरनेट चित्र संग्रह

(“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या अंदाजे निवृत्ती समयी येणाऱ्या आगामी पुस्तकाचा अथवा ब्लॉग चा भाग ज्यात आत्मचरित्र,अनुभव आणि सुचलेले अन्य साहित्य प्रकार आदी लिखाणाचा एक भाग)

Displayed on FB 16th May 2019

No comments:

Post a Comment