पंचमहाभूते की षष्ठम भूत पण आता............. - तंत्रज्ञान !?
लहानपणापासून जेव्हा पासून समजायला लागले तेव्हा पासून ऐकत आलो, अनुभवत आलो कि पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हि पंचमहाभूते सर्वात श्रेष्ठ ! आता ह्यात एक भूत सामील झालेच आहे, कि ज्याचे गारुड मानवी व्यवहारावर इतके भक्क्कमपणे प्रभावित होत आहे कि त्याच्या व्यक्तिसापेक्ष उपयोगाने मानवी जीवनावर फार मोठे पण बहुतेकदा चांगले परिणाम होत आहेत.
आता हेच बघा, रेल्वे अजस्त्र कारभारात मिळणारे उत्पन्न पाठवायचे काल पर्यंत साधन होते कॅश बॅग्स, प्रचंड वजनी कॅश सेफ्स ह्या सर्वांचे डिझाईन पण सर्व सामान्यपणे सर्वाना न उकलणारे ...............
मी २९ वर्षांपूर्वी माझ्या एका सहकाऱ्यांचे शिकाऊ पोस्टिंग झाले होते म्हणून मुंबईच्या कॅश ऑफिस मध्ये माझ्या खात्यातर्फे काय काम असते म्हणून तेथील वरिष्ठांच्या परवानगीने भेट दिली होती मी कॅश ऑफिस मध्ये आता शिरलो आणि अगदी नगद नारायण सर्वत्र बंडलात बांधलेले होते. डोळे दिपून नव्हे तर फुटून जाईल इतकी रोकड, अगदी यंत्रे नसताना जवळ जवळ २० कॅशियर्स मोजत होते आणि २० श्रॉफस ती कॅश विटनेस करत होते, झपाट्याने रेल्वे पोर्टर्स विविध स्टेशनातील भरभक्कम तिजोऱ्या आणणे चालले होते त्या एवढ्या वजनी होत्या अजून फार थोड्या प्रमाणात आहेत कि कॅश ऑफिस चे दगडी फरशीचा बेस चांगला होता अजून आहे म्हणून तगले ते कॅश ऑफिस ...................
हि सर्व प्रचंड चलनी नोटातील रोकड गेल्या वीस वर्षात म्हणजे १९९६ अथवा त्या नंतर लगेच झालेल्या आणि तेव्हापासून अनंत क्षणा पर्यंत चालू राहणाऱ्या तंत्रातील बदलाने जवळ जवळ गायब होत आहे आणि आता तर पुढे म्हणे आजच्या चलनी नोटांच्या तुलनेत फक्त १० टक्के सुद्धा चलनी नोटा रेल्वेत काय जगभरात वापरात राहणार नाहीत असे म्हणतात.
आजच्या पोस्ट चे मुख्य बिंदू आहेत हे फोटो, आमच्या रेल्वे खात्यातील कल्याण जंक्शन वरील एरिया कॅश ऑफिस आज २०१७ मध्ये पूर्ण पाडून तिथे स्टेशन भागामध्ये बदलाचे काम चालू आहे .. भिंती पाडून झाल्यात आज मितीला दरवाजे तावदाने पाडली आहेत आता ह्या चित्रातील कॅश सेफ्स हलवायचे यक्ष काम सुरु होईल आणि येथे होणारे जवळ जवळ शतकभर अब्जावधींची कॅश बाळगलेल्या ह्या तिजोऱ्या एकतर मोडीत नाहीतर संग्रहालयात जातील.......................
अर्थात फक्त हे एकाच भागातील कॅश ऑफिस मध्ये होत आहे असे नाही तर जवळ जवळ देशभर २०० -२५० कॅश ऑफिसेस आणि १००० पूर्ण पुरुष उंचीच्या तिजोऱ्या ह्या नवीन नवीन तंत्रज्ञान वापरामुळे मोडीत निघाल्या आहेत ह्याचे कारण मानवी व्यवहारात रोकड व्यवहारातील ताण, चूक, गैरफायदा, फसवाफसवी आणि मंदपणा हे दोष, कॅशलेस टेक्नोलोंजि पादाक्रांत करत आहे,,,
आता ऑनलाईन बुकिंग, ऑनलाईन मनी ट्रान्स्फरस, ऑनलाईन पेमेंट्स ह्या माध्यमातून रोकड चलनी नोटा गायब झाल्यात आणि होत राहणार कारण जगात साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर ब्लॅकमनी अथवा सरकारपासून लपवलेला पैसे वाढीस लागला होता, आपल्या कडे १९७० च्या दशकात त्याची सुरवात मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली होती म्हणतात पण केवळ रेल्वेचं नाही तर, पोस्ट ऑफिसेस, विविध रेव्हेन्यू ऑफिसेस आणि बँका पण आता जवळ जवळ पुढील काही वर्षात पूर्ण डिजिटल तंत्राकडे वाटचाल करत आहे.
अनेक रोजगार गेले अनेक रोजगार बदलेले गेले, अनेक रोजगार नव्याने निर्माण झाले.
तंत्रज्ञानाने मानवी भावभावनांचा तसेच व्यवहाराचा कोपरा आता व्यापला आहे.
अगदी पहिली टेस्ट ट्यूब बेबी पण आता ४० वर्षाची होणार ह्या जुलै २०१८ मध्ये !
भविष्यातील प्रत्येक क्षण आणि व्यवहार, सतत बदलते तंत्रज्ञान व्यापणार आहे ………………………………….
तिथे ह्या कॅश ऑफिस चे काय ?
( प्रसंगातील बहुतेक सर्व नावे माझ्या आठवणी प्रमाणे आणि केवळ काही मिनटात मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत, केवळ रेल्वेचं नव्हे तर मानवी जीवन व्यवहारावर तंत्रज्ञान आपले गारुड बसवत आहे आणि माणसाला आपल्या तालावर वागवत आहे त्याचे समयोचित कौतुक होणे आवश्यक आहे म्हणून हा खटाटोप) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)
Displayed at FB on 5th December'2017


No comments:
Post a Comment