Thursday, 13 June 2019

१ डिसेंबर - जगभर दाढी करण्याचा दिवस ?

१ डिसेंबर - जगभर दाढी करण्याचा दिवस ?


आज सकाळी कामावरून परत येत होतो, थोडासा झोपाळलेला चालत होतो आणि मग घराजवळ येताना माझा शाळकरी मित्र दीपक भेटला, रोज मॉर्निंग वॉक, त्याचा नित्याचा, दीपक आज जवळ जवळ ५१ वर्षांचा पण अजूनही शालेय विद्यार्थ्यासारखा दिसणारा, खरतर शिक्षणानंतर काही काळ अमेरिकेत राहूनही तिथे न गुंतता भारतात परतलेला आयटी क्षेत्रातील एक दादा माणूस पण…….

नेहमी निरागस शाळकरी मित्र दिसणारा अगदी आम्ही आमच्या शालेय वर्षातील एकदंर ६३ जण आत्ताच ४ नोव्हेंबर रोजी भेटलो होतो पण खरोखर दीपक ची दाढी वाढली नव्हती चार दिवसात ................. पण आज पहाटे दीड वाजता उठून काम केल्यावर झोपाळलेला मी, आज दीपक ला दाढीत बघून गारच ( थंडीत अधिकच) झालो.

दीपक आज स्पष्ट पणे दाढीतच दिसत होता................... दीपक दाढी ?
मी आश्चर्यचकित होऊन जवळ जवळ ओरडलोच, खरं तर बरेच लोक हि त्याची खाजगी गोष्ट आहे म्हणून चौकशी करत नाहीत पण निरागस शालेय वर्षांपासून जसा ते जसा दिसणारा माझा शालेय मित्र दीपक आज चांगल्या दाढीत बघून मला रहावले नाही ....................
आणि मग कळले दाढीचे रहस्य .....................................

पाश्चात्य देशात विशेषतः अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीतील शहरा मधून सुरु झालेल्या दोन चळवळी
"नो शेव नोव्हेंबर आणि मोव्हेंबर "

एका चळवळीत पूर्ण नोव्हेंबर महिना दाढी मिशी ची हजामत / शेव्ह पुरुष करत नाहीत आणि दुसऱ्यात फक्त मिशी वाढवतात.
दाढी मिशी चे वाचलेले - वाचवलेले पैसे हे ह्या निम्मिताने, कँसर आदी आजाराचा रुग्णाच्या सेवे साठी वापरले जातात

आयटी उद्योग इथे स्थिरावला, बहरला, भारतीयांनी त्या वर चांगला वरचश्मा दाखवला, अमेरिका आणि पाश्च्यात्य देशातील व्यवहारामुळे पूर्वीच्या औद्योगिकीकरणात विशेष प्रसिद्ध नसलेली टायर टू शहरे, बेंगलुरू, हैद्राबाद आणि गुरुग्राम विशेष प्रसिद्धी पावली पाठून पुण्यानी पण बाजी मारली स्टार्ड कॉफी शॉप्स, आईसक्रीम पार्लर्स, मॉल्स, फोर स्क्रीन थेटर्स, बार, आयसीएसई तसेच बी स्कुल्स आणि हॉटेल चेन्स उभ्या राहिल्या.

आता............ आयटी उद्योग झगडतोय तो संस्कृती आणि रोजगार संबंधी प्रश्ना मुळे, ह्या देशी पण आणि परदेशी पण .................
रिसेशन, नो जॉब गॅरंटीज, डिप्रेशन, वर्क टेन्शन्स आदी मुळे शिरलेल्या दारू आणि मादक द्रव्यांच्या शिरकाव्यामुळे तसेच नो मॅरेजेस, ब्रेकअपस आणि लिविंग रिलेशनशिप बाबत च्या चर्चा मुळे ............
अश्या वेळेस आज सकाळी दिसलेला दाढीत दिसलेला दीपक, आयटी क्षेत्रातील एक अधिकारी प्रतिनिधी पण अनेक आयटी प्रोफेशनल्स आणि कर्मचाऱ्यासोबत, सामाजिक दान अथवा उत्तरदायित्व साठी काम करणाऱ्या संस्थेसाठी दाढी वाढवून, जागतिक आयटी तसेच जागितिकीकरणाच्या अनेक पदरांपैकी सामाजिक ऋणाच्या प्रयत्नाचा एक पदर सांगून गेला.

( प्रसंगातील बहुतेक सर्व नावे माझ्या आठवणी प्रमाणे आणि केवळ काही मिनटात मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत, एका सामाजिक उपक्रमाचे समयोचित कौतुक होणे आवश्यक आहे म्हणून हा खटाटोप) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

Displayed at FB on 1st December 2017

No comments:

Post a Comment