कालाय तस्मेय नमः !!
“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग
आज, शनिवार, १७ मार्च २०१८, फाल्गुन अमावस्या, धर्मवीर संभाजी महाराज पुण्यतिथी...................
शालिवाहन शक - हिंदू पंचाग पद्धती प्रमाणे हेमलंबी नाम संवत्सराचा शेवटचा दिवस आणि उद्या रविवारी सुरु होणार, विलंबी नाम संवत्सर, , गुढी पाडवा आदी ......................
अर्थात हे सगळे सगळे केवळ तुमच्या साठी, मी आणि माझ्या रेल्वेतील सहकाऱ्यांना, कुठलेही जयंती, पुण्यतिथी, उत्सव, शोक अथवा वार तिथी ग्रहण अथवा अन्य विशेष लागू होत नाहीत.
मै समय हूं........ अनंत हूं........जो कुछ होता है मेरे सामने होता है ........................ भरत भूमी पर.....
अशी सिरीयल " महाभारत" सिरीयल सुरु झाली होती, २ ऑक्टोबर १९८८ आणि बस काही दिवसात मी पहिल्यांदा भुसावळ ला आमच्या ट्रेनिंग सेंटर ला रुजू झालो ते दिवस होते "मिले सूर मेरा तुम्हारा ........माझ्या तुमच्या जुळती धारा ....... मधुर सुरांच्या बरसती धारा" चे दिवस !
मेडिकल झाली होती, कमर्शियल कोर्स क्रमांक ३४० मध्ये अगदी जवळ जवळ ३४० नमुने जमलो तिथे काही तिकीट चेकिंग मध्ये तर काही माझ्या सारखे बुकिंग क्लार्क मध्ये पण आम्ही बुकिंग मध्ये १०० जण ट्रेनिंग मध्ये स्थिरावलो, ट्रेनिंग दरम्यान नैनी - जबलपूर भागात पूर्ण कुंभ च्या रेल्वे व्यवस्थापनात दीड महिने आम्हाला स्वयंसेवक म्हणून पण नेले होते ................. लिहून घेतले होते कि भारतीय संघराज्य असेल जिथे जिथे ,,,,,,,,,,,,, ड्युटी करायला तयार राहा तिथे तिथे !
अर्थात लिहणे, वाचणे आणि अमलात आणणे अथवा स्थानिक व्यवस्थापन सांभाळणे हि थोडी कसरतच असते हे सुरवातीच्या रेल्वे नोकरीत समजले असो, पहिली चार वर्षे बुकिंग क्लार्क मध्ये काढल्यावर मी खाते अंतर्गत, थेट भरती समकक्ष परीक्षा देऊन "गार्ड" मध्ये परत एकदा ट्रेनिंग करून रुजू झालो आणि आता २५ वर्षे होतील तेव्हा पासून दर दोन तीन वर्षांनी सहा अथवा १२ दिवसाचे काम्पिटन्सी रिन्यूअल ट्रेनिंग ते पण कुटुंबापासून दूर राहून अगदी शाळा बोर्डिंग अथवा कॉलेज हॉस्टेल सारखे आदी आता जीवनाचा भाग झाला आहे.
सणवार, जयंती, उत्सव, लग्न कार्य आदी एक तर ड्युटी ऍडजेस्ट करून करायचे अथवा सुट्टी मागायची आणि तीही मिळाली नाहीतर गुमान ड्युटी करायची असे चालू आहे. ह्यात सगळ्यांची साथ आहे आधी आई वडील नंतर सौ आणि मुलगा ह्यांची, अगदी मित्र - मैत्रिणींची सुद्धा... आणि सहकाऱ्यांची आहेच आहे ..
पण नोकरी हि आव्हानांची, वेगवेगळ्या प्रसंगाची अगदी कोणी गाडी वेळेत म्हणून खुश अथवा नाराज तर कोणी गाडी उशिरा म्हणून खुश अथवा नाराज तसेच कोणी काय मेहेरबानी पगार घेतात म्हणून गाड्या चालवतात वगैरे मानणारे असतात ( चूक कोणाचेच नसते पण आपण बरोबर आहोत हे समजून नोकरी केली कि ) सर्व काही सुरळीत आहेत असे समजून नोकरी करत राहायची.
काही जणांनी विचारले कि अजून काही वर्षे नोकरी आहे मग आत्ता पासून लिखाण सुरु केले पण आत्ता तुम्ही सांगा कि धकाधकीचे आयुष्य गेल्यावर एकदम सगळे एकसष्टव्या वर्षी आठवेल का ? म्हणून थोडे थोडे प्रसंग....
परवाच एक काळे कपडे आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेले सद्गृहस्थांची, कामावरून परत येताना उपनगरीय प्रवासी गाडीत भेट झाली,,, ते त्यांच्या कडील पुस्तकावरून तंत्र विद्या वगैरे मध्ये रुची असलेले दिसत होते ........... बोलता बोलता स्थळ, काळ, तिथी, ग्रह दशा आणि दिशा, प्रदोष ग्रहण आदी सर्व तसेच यती, आत्मा वगैरे वगैरे बरीच आस्था गती वगैरे आहे असे समजून आले. पुढे बळी वगैरे आदी बद्दल बोलणे झाले तेव्हा ते म्हणाले मी तांत्रिक विधी करत नाही पण त्यात अभ्यास रुची ठेवतो मग मी म्हंटले आमच्या नोकरीत स्थळ, काळ, तिथी, ग्रह दशा आणि दिशा, प्रदोष ग्रहण आदी सर्व बघून, अभ्यासून नोकरी करायला गेलो तर नोकरी करणेच अवघड ठरेल तेव्हा आत्ता तर आम्ही नोकरी करतोय तेव्हा ते म्हणाले " बाबू, ये होता हि नही ऐसा नही है, तुम इस सबसे उपर उठ आये हो " जो लोग आस्था ( भय ? माझ्या मते ?) रखते है वे समझते है " असे काही बोलून गेला पण त्यांनी बोलबोलता एक "बळी" प्रकाराबद्दल माहिती दिली त्या वर विचार करत मी माझ्या उतरायच्या ठिकाणी उतरलो पण मी त्यांतून सकारात्मक अर्थ घेतला .................
ते सद्गृहस्थ म्हणाले होते कि " कुठलेही चांगले होण्या आधी काही तरी एक वाईट होते तरच तिथे चांगले घडते "
मला प्रथम ह्या विधानावर त्यांचा रोख समाजाला नव्हता तेव्हा ते "बळी" बद्दल बोलत होते ते उमगले तेव्हा मी त्यांना प्रश्न केला हे सगळे थोतांड आहे असे सगळे म्हणतात मग ते म्हणाले
"बेटा, दुनिया मे हर अच्छा होने के पहले कुछ तो बुरा हुवा है और होता रहेगा"
रामायन समझने के पहले सीताजी का वनवास, लंका कि विनाश इतना हि नही लव-कुश के सामाजिक आगमन के पहले सीताजी का फिर वनवास, महाभारत से श्रीमद भगवत गीता समझने के लिये पांडवो का संपत्ती शोषण, शारीरिक कष्ट तथा विनाशकारी युद्ध आधी हुवा है ! "
" पश्चिम कि संस्कृती असे मानती नही ऐसी कहती है किंतु ईसा मसीहा का महत्व उन्हे तो केवल उनके दुःखद निधन बाद हि हुवा इतना हि नही जब विमान से टकराकर टॉवर गिरे जब शेकडो जाने गयी, तबही, हाथीयारो के खिलाडीओ खेल समजने आ गया"
असो अश्या अजब गजब विचारांच्या व्यक्ती काही वेळा धांदरट तर गोधंळ घालणाऱ्या व्यक्ती तर कधी शांत, सज्जन सुस्वभावी लोक यांची भेट होतंच राहते पण वर्ष संपताना, काही कालावधी संपताना परत मागे पाहून एकदा मागे बघावेसे वाटते ........................
अर्थात गाडी फक्त पुढे जात आहे म्हणून नाही तर मागे काही राहिले नाहीं, चुकले नाही हे पण नक्की बघायचे असते आणि पुढे प्रवास करायचा असतो असो
नवीन शालिवाहन शक १९४०, विलंबी नाम संवत्सरासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!
(पोस्ट चा बहुतेक भाग मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत, एखाद्या विषयाचे समयोचित कौतुक आणि आकलन आवश्यक आहे तसेच आपल्या प्रतिक्रिया, सूचना, कौतुक आणि टीका ह्यातुन आणखीन काही शिकायला मिळेल ह्या अपेक्षेने हा खटाटोप !)
(“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)
Displayed at FB on 17th March 2018
No comments:
Post a Comment