आयुष्य
आयुष्य आपल्याला वळणा वळणावर
दिशा बदलायला लावते
कधी उजवी कधी डावी तर कधी
थोडे मागे अथवा पुढे हि नेते.
वेग बदलतो दिशा बदलते पण
आयुष्य बदलत नाही ................
आयुष्य ते तर बदलू शकत नाही.
आपण खूप प्रयत्न करतो जे घडत असते
त्यास बदलण्याचा पण शेवटी आयुष्याला
एक स्वत:ची गती अन दिशा असते.
आयुष्य आपल्याला वळणा वळणावर
दिशा बदलायला लावते.
शेवटच्या चाकावरून
© रविंद्र गांगल.
(“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी प्रस्तावित पुस्तक लिखाणाचा एक भाग)
अथवा ब्लॉग लिंक पोस्ट
© https://shevatachyachakavarun.blogspot.com/