Thursday, 13 June 2019

गुढी

No photo description available.

गुढी 

गुढी आनंदाची, नववर्षाची, वसंत ऋतूतील सळसळणाऱ्या चैतन्याची, कधी परिश्रमाची, कर्तव्यपूर्तीची अन चक्क भिक्षांदेहीची पण .................
गुढी पाडव्याच्या पूर्व संध्येवर नवंवर्षयात्रांची माहिती संदेश गेल्या वर्षीचे फोटो सगळे सोशल मीडिया वर झळकू लागले. लहानपणी आई बाबा ते गुढीला बत्तासे अथवा छोट्या मिठाई वाल्या कडून साखर पाकाच्या रंगीत गाठी ची माळ आणायचे अगदी तश्याच गाठी ची फोटो आमच्या बरोबरीच्या म्हणजे पन्नाशीतील आमच्या शाळेतल्या वर्ग मैत्रिणीने कौतुकाने मी घरी ह्या साखरपाकाचा गाठी केल्या म्हणून फोटो पाठविले, काही नी छान कौतुक देखील केले, एक दोन कॉमेंट आले नाही मी तर बाह्रेरून विकत आणते, नाही होत करायला वेळ ! अर्थात ज्या वर्गमैत्रिणीने पन्नाशीत ह्या साखर पाक गाठी केल्या तिचा पाडवा आनंदाचा अन परिश्रमाचा !

सण म्हंटले कि आम्हा रेल्वे वाल्याना मध्यम वर्गीय क्षेत्रातील घरे, वाड्या वस्त्या अन उपनगरे आठवतात, अगदी परवडत नाही महागाईने मेटाकुटीला आलेला मध्यमवर्गीय सण मात्र सारे उत्साहाने साजरे करतो. होळीचा रंग नाही उतरत तर गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती अक्षय तृतीया आषाढी वटपौर्णिमा श्रावण पूजा व्रत वैकल्ये भाद्रपद गौरी गणपती पितृपंधरवाड्यातून बाहेर पडलो कि नवरात्र मग दिवाळी अन आता सगळ्या मॉल अन इंग्लिश मिडीयम कल्चर मुळे मेरी ख्रिसमस मग संक्रांत अन परत होळी ! म्हणजे गुढी आनंदाची सुरुच !

आता हे म्हणाल कि हे सर्व आम्हाला पाठ आहे मग त्या गुढी पाडव्याच्या लेखनाचे काय !? आता सुरवात कुठे !?

काही वर्षांपूर्वी पण उद्या असलेल्या तपोवन एक्सप्रेस च्या वर्किंग सारखाच दिवस अन दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा देखील ! मी असाच कसाऱ्याला तपोवन च्या बँकर इंजिन ची वाट बघत होतो अन हलकी ब्लाइंड केन स्टिक चा आवाज आला. मी आवाजा कडे बघितले, अन क्षणभर मनाशी पुटपुटलो अरे हा तर "राम" अर्ध दृष्टिहीन भिक्षांदेही ! 

न राहून मी आव्वाज दिला, अरे राम ! इथे कुठे ? साहेब कोण ? कोणी त्याला सांगितले अरे तपोवन चे गार्ड साहेबानी आवाज दिला म्हणून ! राम पुढे आला त्यांनी मला परत विचारले कि पंचवटी गेली का ?
का पटना जनता येणार ? मी म्हंटले कि पॉईंट्स मन म्हणत होता पंचवटी जायचेय म्हणून येईल इतक्यात! मी विचारले अरे तू कसाऱ्यात कसा ? तर तो म्हणाला साहेब उद्या गुढी पाडवा शाळा कॉलेज बँक उद्योग धंदे वाल्याना सुट्ट्या असतात नाहीतर ते सकाळी उशिरा कामावर जातात ! उद्याचे पण पोट पाणी आजच गाडीत फिरून गोळा केले पाहिजे. 

तपोवन चे बँकिंग इंजिन्स लागली तपोवन घाट माथा चढू लागणार तेवढ्यात पंचवटी समोर घाटमाथ्यावरून उतरून आली होती, राम अन त्याच्या बरोबरची छान ब्लाइंड केन बेल चा आवाज करत माझ्या समोरून गाडीत चढले अन मग त्यांनी उद्याचे म्हणजे गुढी पाडव्याचे पण पोट पाणी मागायला सुरवात केली असेल, दे दाता के नाम !, शिर्डी वाले साई बाबा ! अन जुने केशवा माधवा हि गाणी तर कधी कोणी केन वाला बासरी घेऊन पोट पाणी मागण्यास सज्ज !

उपनगरीय विभागात काम करायचो तेव्हा हा राम पहिल्यांदा दिसला होता, हिवाळ्यातील धुक्यामुळे माझी अगदी पहाटेची दुसरी कर्जत गाडी अंमळ थोडी उशिराच होती. गाडी वांगणीत शिरत होती अन नेरळ दिशेच्या ट्रॅक मधून हे दोन चार केन स्टिक वाले धावत, अडखळत होते अन ती कर्जत मुंबई गाडी कसोशीने पकडायच्या प्रयत्नात होते. दोघे तिघे अंध खरतर आता दिव्यांग म्हणायला हवे अगदी शार्प शुटर असल्या सारखे त्या ट्रॅक मधून जोशात चालत होते अन हा राम मागे अडखळत होता.

पहिल्या दोघांनी पुढच्या राम सहित आणखीन एका साठी मला आर्जव केले कि साहेब त्यांना येऊ दे गाडी हुकली तर पोट पाणी बरोबर होणार नाही.

वांगणी हुन हि मंडळी अगदी आजही सकाळच्या कर्जत मुंबई लोकल मधून कल्याण, दादर हुन विविध मेल एक्सप्रेस गाड्यात तसेच काही ठराविक डाऊन च्या लोकल गाड्यातून पोट पाण्याचा म्हणजे भिक्षांदेही चा उद्योग करतात. सकाळच्या ह्या ठराविक गाड्या पकडून त्यात पोट पाणी करून परत दुपार नंतर वांगणीत येतात. अनेक वर्षे हे बघत आलो आत्ता कदाचित बदलेल कारण वांगणी पण काँक्रीट जंगल झाले काही स्थिर स्थावर दिव्याच्या चाळी मधून यायला लागले असतील. काही जण लॉटरी विकतात तर काही बासरी तर काही ती गाणी म्हणून आपला उदरनिर्वाह चालवतात. 

गुढी पाडवा अन इतर सार्वत्रिक सुट्ट्यांच्या आदल्या दिवशी ह्यांचा विशेष आटापिठा असतो ते दुसऱ्या दिवसाच्या पोटपाणी पण आजच मिळवण्याचा !

मग हि गुढी परिश्रमाची कि भिक्षांदेही ची ते तुम्ही ठरवावे.

माझ्या वर्गमैत्रिणीचे पण साखरेच्या पाकातील गाठीतील गुढी चे तोरण पण परिश्रमाचे अन आनंदाचे !

परिश्रमाची प्रत्येकाची व्याख्याच वेगळी असते हे पण मला रेल्वेत लागल्यावर एका अनुभवातून कळले.

हो गुढीपाडवा च होता तो बहुतेक, माझ्या रेल्वेतील मित्राच्या बहिणीचे लग्न होते की साखरपुडा होता पुण्याला, १९९० साल असावे इंद्रायणी मुंबई दादर लोणावळा शिवाजीनगर अन पुणे एवढीच स्टेशने घ्यायची मी दादर हुन आरक्षित डब्यात दुसऱ्या वर्गात सिंगल खिडकीच्या बाजूला पकडली अन समोर पाईप ओढणारे बहुतेक सेवा निवृत्त सैनिकी अधिकारी असावे अन पाईप ओढण्याच्या सवयी मुळे दुसऱ्या वर्गातील खिडकी आरक्षित केली असावी. खूप सारी चांगल्या दर्जाची मासिके एक दोन पुस्तके सोबत होती वाचन सुरु झाले. गाडी दादर हुन सुरु झाले अन एक टिकरी वाला भिक्षांदेही सुरु झाला " ओ मेरे साई देवा............." ते अन " केशवा माधवा ...." ह्या दोन गाण्याचे त्याच्या सुरेल (?) आवाजात अक्षरशः पाठांतर झाले कर्जत येई पर्यंत, कर्जत ला वडापाव अन चहा झाला, घाट डोंगर बोगदे सुरु झाले, खंडाळ्याची थंड हवेची झुळूक आली अन समोरील पाईप वाल्या प्रवाशाची उतरण्याची चिन्हे सुरु झाली. तो थोडा आक्रमक स्वरात ओरडला की "ह्यांना काम धंदे नको करायला मेहनत नको नुसती भीक हवी" त्याच्या त्या मेहनत नको ह्या वाक्यावर तो भिक्षांदेही भडकला अन चक्क म्हणाला " साहेब ! दादर पासून इथपर्यंत सगळ्या डब्यातून अनेक फेऱ्या मारल्या मग मेहनतीने हे चार पैसे जमा झाले, तुम्हाला द्यायचे नाहीत नका देऊ पण बिगर मेहनतीचे बोलू नका"

रेल्वेतील ह्या अन अश्या अनुभवातून जीवन गुढी हळू हळू स्थिर होत गेली अन दरवेळच्या गुढी पाडव्या आधी ते भिक्षांदेही आठवतात की आज हि ते पोटा पाण्याचा गुढ्या मध्यमवर्गीय प्रवाशांच्या दातृत्वा वर अन त्यांच्या आनंदाकडे बघत जगत असतात. 

गुढी मग ती असो परिश्रमाची, आनंदाची, कर्तव्यपूर्तीची अथवा भिक्षांदेहीची पण झळकत राहो !

येणारे शालिवाहन शक वर्ष आपणा सर्वाना गुढी पाडव्या पासून अगदी होळी पर्यंत आनंदात जावो ! 

© रविंद्र गांगल

(पोस्ट चा बहुतेक भाग मिळालेल्या माहिती वर तसेच बराचसा काल्पनिक आहे, एखाद्या व्यक्ती / संस्थे अथवा क्षेत्रा बद्दल समयोचित कौतुक आणि आकलन आवश्यक आहे तसेच आपल्या प्रतिक्रिया, सूचना, कौतुक आणि टीका ह्यातुन आणखीन काही शिकायला मिळेल ह्या अपेक्षेने हा खटाटोप!) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

सण म्हंटले कि आम्हा रेल्वे वाल्याना मध्यम वर्गीय क्षेत्रातील घरे, वाड्या वस्त्या अन उपनगरे आठवतात, अगदी परवडत नाही महागाईने मेटाकुटीला आलेला मध्यमवर्गीय सण मात्र सारे उत्साहाने साजरे करतो. होळीचा रंग नाही उतरत तर गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती अक्षय तृतीया आषाढी वटपौर्णिमा श्रावण पूजा व्रत वैकल्ये भाद्रपद गौरी गणपती पितृपंधरवाड्यातून बाहेर पडलो कि नवरात्र मग दिवाळी अन आता सगळ्या मॉल अन इंग्लिश मिडीयम कल्चर मुळे मेरी ख्रिसमस मग संक्रांत अन परत होळी ! म्हणजे गुढी आनंदाची सुरुच !
आता हे म्हणाल कि हे सर्व आम्हाला पाठ आहे मग त्या गुढी पाडव्याच्या लेखनाचे काय !? आता सुरवात कुठे !?
काही वर्षांपूर्वी पण उद्या असलेल्या तपोवन एक्सप्रेस च्या वर्किंग सारखाच दिवस अन दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा देखील ! मी असाच कसाऱ्याला तपोवन च्या बँकर इंजिन ची वाट बघत होतो अन हलकी ब्लाइंड केन स्टिक चा आवाज आला. मी आवाजा कडे बघितले, अन क्षणभर मनाशी पुटपुटलो अरे हा तर "राम" अर्ध दृष्टिहीन भिक्षांदेही ! 
न राहून मी आव्वाज दिला, अरे राम ! इथे कुठे ? साहेब कोण ? कोणी त्याला सांगितले अरे तपोवन चे गार्ड साहेबानी आवाज दिला म्हणून ! राम पुढे आला त्यांनी मला परत विचारले कि पंचवटी गेली का ?का पटना जनता येणार ? मी म्हंटले कि पॉईंट्स मन म्हणत होता पंचवटी जायचेय म्हणून येईल इतक्यात! मी विचारले अरे तू कसाऱ्यात कसा ? तर तो म्हणाला साहेब उद्या गुढी पाडवा शाळा कॉलेज बँक उद्योग धंदे वाल्याना सुट्ट्या असतात नाहीतर ते सकाळी उशिरा कामावर जातात ! उद्याचे पण पोट पाणी आजच गाडीत फिरून गोळा केले पाहिजे. 
तपोवन चे बँकिंग इंजिन्स लागली तपोवन घाट माथा चढू लागणार तेवढ्यात पंचवटी समोर घाटमाथ्यावरून उतरून आली होती, राम अन त्याच्या बरोबरची छान ब्लाइंड केन बेल चा आवाज करत माझ्या समोरून गाडीत चढले अन मग त्यांनी उद्याचे म्हणजे गुढी पाडव्याचे पण पोट पाणी मागायला सुरवात केली असेल, दे दाता के नाम !, शिर्डी वाले साई बाबा ! अन जुने केशवा माधवा हि गाणी तर कधी कोणी केन वाला बासरी घेऊन पोट पाणी मागण्यास सज्ज !
उपनगरीय विभागात काम करायचो तेव्हा हा राम पहिल्यांदा दिसला होता, हिवाळ्यातील धुक्यामुळे माझी अगदी पहाटेची दुसरी कर्जत गाडी अंमळ थोडी उशिराच होती. गाडी वांगणीत शिरत होती अन नेरळ दिशेच्या ट्रॅक मधून हे दोन चार केन स्टिक वाले धावत, अडखळत होते अन ती कर्जत मुंबई गाडी कसोशीने पकडायच्या प्रयत्नात होते. दोघे तिघे अंध खरतर आता दिव्यांग म्हणायला हवे अगदी शार्प शुटर असल्या सारखे त्या ट्रॅक मधून जोशात चालत होते अन हा राम मागे अडखळत होता.
पहिल्या दोघांनी पुढच्या राम सहित आणखीन एका साठी मला आर्जव केले कि साहेब त्यांना येऊ दे गाडी हुकली तर पोट पाणी बरोबर होणार नाही.
वांगणी हुन हि मंडळी अगदी आजही सकाळच्या कर्जत मुंबई लोकल मधून कल्याण, दादर हुन विविध मेल एक्सप्रेस गाड्यात तसेच काही ठराविक डाऊन च्या लोकल गाड्यातून पोट पाण्याचा म्हणजे भिक्षांदेही चा उद्योग करतात. सकाळच्या ह्या ठराविक गाड्या पकडून त्यात पोट पाणी करून परत दुपार नंतर वांगणीत येतात. अनेक वर्षे हे बघत आलो आत्ता कदाचित बदलेल कारण वांगणी पण काँक्रीट जंगल झाले काही स्थिर स्थावर दिव्याच्या चाळी मधून यायला लागले असतील. काही जण लॉटरी विकतात तर काही बासरी तर काही ती गाणी म्हणून आपला उदरनिर्वाह चालवतात. 
गुढी पाडवा अन इतर सार्वत्रिक सुट्ट्यांच्या आदल्या दिवशी ह्यांचा विशेष आटापिठा असतो ते दुसऱ्या दिवसाच्या पोटपाणी पण आजच मिळवण्याचा !
मग हि गुढी परिश्रमाची कि भिक्षांदेही ची ते तुम्ही ठरवावे.
माझ्या वर्गमैत्रिणीचे पण साखरेच्या पाकातील गाठीतील गुढी चे तोरण पण परिश्रमाचे अन आनंदाचे !
परिश्रमाची प्रत्येकाची व्याख्याच वेगळी असते हे पण मला रेल्वेत लागल्यावर एका अनुभवातून कळले.
हो गुढीपाडवा च होता तो बहुतेक, माझ्या रेल्वेतील मित्राच्या बहिणीचे लग्न होते की साखरपुडा होता पुण्याला, १९९० साल असावे इंद्रायणी मुंबई दादर लोणावळा शिवाजीनगर अन पुणे एवढीच स्टेशने घ्यायची मी दादर हुन आरक्षित डब्यात दुसऱ्या वर्गात सिंगल खिडकीच्या बाजूला पकडली अन समोर पाईप ओढणारे बहुतेक सेवा निवृत्त सैनिकी अधिकारी असावे अन पाईप ओढण्याच्या सवयी मुळे दुसऱ्या वर्गातील खिडकी आरक्षित केली असावी. खूप सारी चांगल्या दर्जाची मासिके एक दोन पुस्तके सोबत होती वाचन सुरु झाले. गाडी दादर हुन सुरु झाले अन एक टिकरी वाला भिक्षांदेही सुरु झाला " ओ मेरे साई देवा............." ते अन " केशवा माधवा ...." ह्या दोन गाण्याचे त्याच्या सुरेल (?) आवाजात अक्षरशः पाठांतर झाले कर्जत येई पर्यंत, कर्जत ला वडापाव अन चहा झाला, घाट डोंगर बोगदे सुरु झाले, खंडाळ्याची थंड हवेची झुळूक आली अन समोरील पाईप वाल्या प्रवाशाची उतरण्याची चिन्हे सुरु झाली. तो थोडा आक्रमक स्वरात ओरडला की "ह्यांना काम धंदे नको करायला मेहनत नको नुसती भीक हवी" त्याच्या त्या मेहनत नको ह्या वाक्यावर तो भिक्षांदेही भडकला अन चक्क म्हणाला " साहेब ! दादर पासून इथपर्यंत सगळ्या डब्यातून अनेक फेऱ्या मारल्या मग मेहनतीने हे चार पैसे जमा झाले, तुम्हाला द्यायचे नाहीत नका देऊ पण बिगर मेहनतीचे बोलू नका"
रेल्वेतील ह्या अन अश्या अनुभवातून जीवन गुढी हळू हळू स्थिर होत गेली अन दरवेळच्या गुढी पाडव्या आधी ते भिक्षांदेही आठवतात की आज हि ते पोटा पाण्याचा गुढ्या मध्यमवर्गीय प्रवाशांच्या दातृत्वा वर अन त्यांच्या आनंदाकडे बघत जगत असतात. 
गुढी मग ती असो परिश्रमाची, आनंदाची, कर्तव्यपूर्तीची अथवा भिक्षांदेहीची पण झळकत राहो !
येणारे शालिवाहन शक वर्ष आपणा सर्वाना गुढी पाडव्या पासून अगदी होळी पर्यंत आनंदात जावो ! 
© रविंद्र गांगल
(पोस्ट चा बहुतेक भाग मिळालेल्या माहिती वर तसेच बराचसा काल्पनिक आहे, एखाद्या व्यक्ती / संस्थे अथवा क्षेत्रा बद्दल समयोचित कौतुक आणि आकलन आवश्यक आहे तसेच आपल्या प्रतिक्रिया, सूचना, कौतुक आणि टीका ह्यातुन आणखीन काही शिकायला मिळेल ह्या अपेक्षेने हा खटाटोप!) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)सण म्हंटले कि आम्हा रेल्वे वाल्याना मध्यम वर्गीय क्षेत्रातील घरे, वाड्या वस्त्या अन उपनगरे आठवतात, अगदी परवडत नाही महागाईने मेटाकुटीला आलेला मध्यमवर्गीय सण मात्र सारे उत्साहाने साजरे करतो. होळीचा रंग नाही उतरत तर गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती अक्षय तृतीया आषाढी वटपौर्णिमा श्रावण पूजा व्रत वैकल्ये भाद्रपद गौरी गणपती पितृपंधरवाड्यातून बाहेर पडलो कि नवरात्र मग दिवाळी अन आता सगळ्या मॉल अन इंग्लिश मिडीयम कल्चर मुळे मेरी ख्रिसमस मग संक्रांत अन परत होळी ! म्हणजे गुढी आनंदाची सुरुच !आता हे म्हणाल कि हे सर्व आम्हाला पाठ आहे मग त्या गुढी पाडव्याच्या लेखनाचे काय !? आता सुरवात कुठे !?काही वर्षांपूर्वी पण उद्या असलेल्या तपोवन एक्सप्रेस च्या वर्किंग सारखाच दिवस अन दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा देखील ! मी असाच कसाऱ्याला तपोवन च्या बँकर इंजिन ची वाट बघत होतो अन हलकी ब्लाइंड केन स्टिक चा आवाज आला. मी आवाजा कडे बघितले, अन क्षणभर मनाशी पुटपुटलो अरे हा तर "राम" अर्ध दृष्टिहीन भिक्षांदेही ! न राहून मी आव्वाज दिला, अरे राम ! इथे कुठे ? साहेब कोण ? कोणी त्याला सांगितले अरे तपोवन चे गार्ड साहेबानी आवाज दिला म्हणून ! राम पुढे आला त्यांनी मला परत विचारले कि पंचवटी गेली का ?का पटना जनता येणार ? मी म्हंटले कि पॉईंट्स मन म्हणत होता पंचवटी जायचेय म्हणून येईल इतक्यात! मी विचारले अरे तू कसाऱ्यात कसा ? तर तो म्हणाला साहेब उद्या गुढी पाडवा शाळा कॉलेज बँक उद्योग धंदे वाल्याना सुट्ट्या असतात नाहीतर ते सकाळी उशिरा कामावर जातात ! उद्याचे पण पोट पाणी आजच गाडीत फिरून गोळा केले पाहिजे. तपोवन चे बँकिंग इंजिन्स लागली तपोवन घाट माथा चढू लागणार तेवढ्यात पंचवटी समोर घाटमाथ्यावरून उतरून आली होती, राम अन त्याच्या बरोबरची छान ब्लाइंड केन बेल चा आवाज करत माझ्या समोरून गाडीत चढले अन मग त्यांनी उद्याचे म्हणजे गुढी पाडव्याचे पण पोट पाणी मागायला सुरवात केली असेल, दे दाता के नाम !, शिर्डी वाले साई बाबा ! अन जुने केशवा माधवा हि गाणी तर कधी कोणी केन वाला बासरी घेऊन पोट पाणी मागण्यास सज्ज !उपनगरीय विभागात काम करायचो तेव्हा हा राम पहिल्यांदा दिसला होता, हिवाळ्यातील धुक्यामुळे माझी अगदी पहाटेची दुसरी कर्जत गाडी अंमळ थोडी उशिराच होती. गाडी वांगणीत शिरत होती अन नेरळ दिशेच्या ट्रॅक मधून हे दोन चार केन स्टिक वाले धावत, अडखळत होते अन ती कर्जत मुंबई गाडी कसोशीने पकडायच्या प्रयत्नात होते. दोघे तिघे अंध खरतर आता दिव्यांग म्हणायला हवे अगदी शार्प शुटर असल्या सारखे त्या ट्रॅक मधून जोशात चालत होते अन हा राम मागे अडखळत होता.पहिल्या दोघांनी पुढच्या राम सहित आणखीन एका साठी मला आर्जव केले कि साहेब त्यांना येऊ दे गाडी हुकली तर पोट पाणी बरोबर होणार नाही.वांगणी हुन हि मंडळी अगदी आजही सकाळच्या कर्जत मुंबई लोकल मधून कल्याण, दादर हुन विविध मेल एक्सप्रेस गाड्यात तसेच काही ठराविक डाऊन च्या लोकल गाड्यातून पोट पाण्याचा म्हणजे भिक्षांदेही चा उद्योग करतात. सकाळच्या ह्या ठराविक गाड्या पकडून त्यात पोट पाणी करून परत दुपार नंतर वांगणीत येतात. अनेक वर्षे हे बघत आलो आत्ता कदाचित बदलेल कारण वांगणी पण काँक्रीट जंगल झाले काही स्थिर स्थावर दिव्याच्या चाळी मधून यायला लागले असतील. काही जण लॉटरी विकतात तर काही बासरी तर काही ती गाणी म्हणून आपला उदरनिर्वाह चालवतात. गुढी पाडवा अन इतर सार्वत्रिक सुट्ट्यांच्या आदल्या दिवशी ह्यांचा विशेष आटापिठा असतो ते दुसऱ्या दिवसाच्या पोटपाणी पण आजच मिळवण्याचा !मग हि गुढी परिश्रमाची कि भिक्षांदेही ची ते तुम्ही ठरवावे.माझ्या वर्गमैत्रिणीचे पण साखरेच्या पाकातील गाठीतील गुढी चे तोरण पण परिश्रमाचे अन आनंदाचे !परिश्रमाची प्रत्येकाची व्याख्याच वेगळी असते हे पण मला रेल्वेत लागल्यावर एका अनुभवातून कळले.हो गुढीपाडवा च होता तो बहुतेक, माझ्या रेल्वेतील मित्राच्या बहिणीचे लग्न होते की साखरपुडा होता पुण्याला, १९९० साल असावे इंद्रायणी मुंबई दादर लोणावळा शिवाजीनगर अन पुणे एवढीच स्टेशने घ्यायची मी दादर हुन आरक्षित डब्यात दुसऱ्या वर्गात सिंगल खिडकीच्या बाजूला पकडली अन समोर पाईप ओढणारे बहुतेक सेवा निवृत्त सैनिकी अधिकारी असावे अन पाईप ओढण्याच्या सवयी मुळे दुसऱ्या वर्गातील खिडकी आरक्षित केली असावी. खूप सारी चांगल्या दर्जाची मासिके एक दोन पुस्तके सोबत होती वाचन सुरु झाले. गाडी दादर हुन सुरु झाले अन एक टिकरी वाला भिक्षांदेही सुरु झाला " ओ मेरे साई देवा............." ते अन " केशवा माधवा ...." ह्या दोन गाण्याचे त्याच्या सुरेल (?) आवाजात अक्षरशः पाठांतर झाले कर्जत येई पर्यंत, कर्जत ला वडापाव अन चहा झाला, घाट डोंगर बोगदे सुरु झाले, खंडाळ्याची थंड हवेची झुळूक आली अन समोरील पाईप वाल्या प्रवाशाची उतरण्याची चिन्हे सुरु झाली. तो थोडा आक्रमक स्वरात ओरडला की "ह्यांना काम धंदे नको करायला मेहनत नको नुसती भीक हवी" त्याच्या त्या मेहनत नको ह्या वाक्यावर तो भिक्षांदेही भडकला अन चक्क म्हणाला " साहेब ! दादर पासून इथपर्यंत सगळ्या डब्यातून अनेक फेऱ्या मारल्या मग मेहनतीने हे चार पैसे जमा झाले, तुम्हाला द्यायचे नाहीत नका देऊ पण बिगर मेहनतीचे बोलू नका"रेल्वेतील ह्या अन अश्या अनुभवातून जीवन गुढी हळू हळू स्थिर होत गेली अन दरवेळच्या गुढी पाडव्या आधी ते भिक्षांदेही आठवतात की आज हि ते पोटा पाण्याचा गुढ्या मध्यमवर्गीय प्रवाशांच्या दातृत्वा वर अन त्यांच्या आनंदाकडे बघत जगत असतात. गुढी मग ती असो परिश्रमाची, आनंदाची, कर्तव्यपूर्तीची अथवा भिक्षांदेहीची पण झळकत राहो !येणारे शालिवाहन शक वर्ष आपणा सर्वाना गुढी पाडव्या पासून अगदी होळी पर्यंत आनंदात जावो ! © रविंद्र गांगल(पोस्ट चा बहुतेक भाग मिळालेल्या माहिती वर तसेच बराचसा काल्पनिक आहे, एखाद्या व्यक्ती / संस्थे अथवा क्षेत्रा बद्दल समयोचित कौतुक आणि आकलन आवश्यक आहे तसेच आपल्या प्रतिक्रिया, सूचना, कौतुक आणि टीका ह्यातुन आणखीन काही शिकायला मिळेल ह्या अपेक्षेने हा खटाटोप!) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.) — feeling blessed.

Displayed on FB 4th May 2019

No comments:

Post a Comment