Thursday, 13 June 2019

दर्शन

दर्शन


तो अलीकडचा शुक्रवार होता अन मी चक्क हरखून गेले कारण माझ्या नवीन बदलीच्या जागी मन अजिबात रमत नव्हते ते थोडे फार मन रमू लागले.

धुळवडीच्या दुसऱ्या दिवशीच्या शुक्रवारी मी माझ्या ऑफिस मधल्या मैत्रिणीची वाट बघत परळ च्या ब्रिज वर उभे होते. सकाळी नीट नेटके आवरून अंमळ थोडे ऑफिस टाइमिंगच्या अलीकडे पोहोचणे माझ्या अंगवळणी पडलेले होते. मी मैत्रिणीची वाट आणखीन एक गाडीच्या नंतर बघायची सोडून देणारच होते तितक्यात तिचा फोन आला ती म्हणाली "अग मला जास्त उशीर होईल तू जरा पुढे हो कारण तुला उगीच लेट व्हायला नको" तो फोन बंद करून मी ब्रिज वरून पूर्वेला जायला वळणार तेवढ्यात मला लक्षात आले कि आपल्या कडे कोणीतरी निरखून बघतंय त्या एल्फिस्टन साईड नी येत होत्या, मी थोडा आनंदाने आवाज दिला, मॅडम !.............
छान लाईट प्रिंट ची साडी अन त्या वर स्लीव्ह लेस ब्लाउज अंमळ उंची इतर भारतीय बायकांपेक्षा जास्त, चालण्यात डौल अन वागण्यात रुबाब. गंमत माझी जिथे काही काळा पूर्वी जिथे बदली झाली तिथेच त्या काम करायच्या. मॅडम ची दोन्ही मुले उच्चशिक्षित अन परदेशात स्थायिक झालेली त्या खरंतर लवकर सेवानिवृत्ती घेण्याची गरज नव्हती पण कारणच तसेच झाले एकदा त्यांची मुलगी आणि एकदा त्यांची सून दोघी एका वर्षात बाळंतपणाला ड्यू होत्या मग डिपार्टमेन्ट नी पूर्ण वर्षाची रजा देताना थोडी ब्रेक मध्ये घ्यायला सांगितली पण मॅडम ते पसंत नव्हते मग त्यानी सरळ स्वेच्छा निवृत्ती चा मार्ग स्वीकारला जो डिपार्टमेंट नी मोठा कष्टी होऊन स्वीकारला. असो

मॅडम, आज अचानक इकडे ? अग फुल मार्केट ला आले होते थोडी सिलेक्टिव्ह फुले घ्यायला अन छान गुलाब दिसले मग म्हंटले कामावर असताना वर्षोनुवर्षे आपल्या ऑफिस च्या जवळील महालक्ष्मी मंदिरात जायचे तर आज पण जाऊन येऊ. अन तू दिसलीस थोडे खरे वाटेना पण आठवले कि तुझी अलीकडे इकडे बदली झाली आहे प्रमोशन वर !

मॅडम ! काय हो थट्टा करता तुम्ही मी सर्व्हिस जॉईन केली तेव्हा हेड ऑफिस ला होतात अन तुम्ही दिलेले प्रॅक्टिकल जॉब नॉलेज आज हि विसरता येत नाही अन तुम्ही माझ्या प्रमोशन बद्दल बोलताय.
आज महालक्ष्मी मंदिरात जायचे म्हणताय तर मी जरा पुढे होते अन कार्ड पंच करून ऑफिस मधले काम घेऊन आज जवळच्या ऑफिस मध्ये जायचे आहे तर तिथे दर्शन घ्यायला येते. मॅडम हो म्हणाल्या अन मी लगबगीने पुढे निघाले. कार्ड पंच झाले माझ्या कामाच्या फाईल्स घेतल्या अन शिपाई बाई कडे इन्चार्ज मॅडम ना निरोप ठेऊन सब ऑफिस कडे निघाले अन निघताना एक छान तूप लावलेली पुरण पोळी, थोडे दूध, पाणी अन चमचा असे सगळे बरोबर घेतले.
मॅडम नी एक गुलाबाचे फुल मला दिले होते ते केसात माळले अन मग सब ऑफिस च्या वाटेवर महालक्ष्मी मंदिरात फोहोचले तर मॅडम आत गाभाऱ्या जवळ देवीला छान फुले अर्पण करत होत्या अन सकाळी पुजारी एक नैमित्तिक सकाळची पूजा केल्या वर थेट संध्याकाळच्या आरतीला यायचा मध्ये एक आजी देवीचे सर्व यथासांग उपचार बघत होत्या. आज बघितले तर आज आजी खूप खुश होत्या मग मला राहवले नाही.

मी पण आत गाभाऱ्यात प्रवेश केला तर आजीनी मला खुणावले कि मॅडम कडून पूजन होतंय म्हणून तर मॅडम च्या ते लक्षात आले त्यांनी आजींना म्हंटले कि ह्या आता इथे नवीन मॅडम आहेत माझ्या जागेवर मग मात्र मी ओशाळले.

प्रदक्षिणा झाल्यावर मॅडम नी जवळ उभे केले आणि आम्ही दोघीनी एकाच वेळेस महालक्ष्मी ला मनोभावे नमस्कार केला मग जवळच्या बाकावर बसलो, मॅडम ना पुरण पोळी दिली त्यानी ती घेतली, खरंतर त्या कधीही अधे मध्ये काही खात नाहीत पण मी हेड ऑफिस ला लागले तेव्हा पासून सगळे विचारायचे कि मॅडम हि धाकटी बहीण का ? ह्यांचा पण चेहरा कायम आनंदी अन ताजा दिसतो. मग मॅडम हि पुरुष कर्मचारी नसले कि हळूच माझ्या गालावर हलकेच हात फिरवून म्हणायच्या कि नेहमी आनंदी राहा,
पण मी आता मात्र माझी कैफियत मांडली अन मॅडम ना म्हंटले, मॅडम मी लवकर राजीनामा देणार मला नाही झेपत इथे काम ! त्या वर मॅडम म्हणाल्या काय झाले ग तू तर कधी हिरमुसत नाहीस.
मी म्हंटले मॅडम मी सर्व्हिस मध्ये आधी दहावर्षे हेड ऑफिस नंतर उपनगरे मग विविध कार्यालयात फिरतीची नोकरी केली पण इथे केवळ काही महिन्यात कंटाळा आला. इथे प्रचंड संख्येने अशक्त, दुखी अथवा विवंचनेतील चेहरे बघायला मिळतात आख्या परळ हॉस्पिटल कॉम्प्लेक्स मध्ये आणि ह्या भागातील रुग्ण सेवे मुळे आनंदी असणाऱ्यांचे प्रमाण कमी त्यात अगदी रोज मैत्रिणीची वाट बघत स्टेशन ला उभी असते तर तिथे ब्रिटिश कसे काय चूक करून गेले असे मनात येते कि इथे एवढी जुनी जुनी हॉस्पिटल्स आहे पण रॅम्प वाला ब्रिज नाही परळ आणि एल्फिस्टन / प्रभादेवी ला जेणे करून व्हील चेअर नीट येऊन जाऊ शकतील आता ते एस्केलेटर लावलेत पण पेशंट धजावत नाहीत

मला खूप निराश व्हायला होते असे वाटते इथे एवढे निराशेच्या वातावरणात काम करायचे तर त्या पेक्षा सोडून द्यावी नोकरी. !
मॅडम म्हणाल्या अग तुझी तीन महिन्या पूर्वी इथे बदली झाली अन मग ह्या ऑफिस मधला जुना शिवा नावाचा शिपाई आहे ना त्याचा फोन होता म्हणाला मॅडम मार्च अखेर मी रिटायर्ड होतो आहे तेव्हा माझ्या रिटायमेन्ट पार्टीला या. त्यांनीच सांगितले कि तुमची बहीण आली आहे ह्या सेक्शन ला ! आहे कि नाही गंमत तू सर्व्हिस ला हेड ऑफिस लागली तेव्हा पण सगळे विचारायचे मॅडम तुमची बहीण का?

अग मी जेव्हा हेड ऑफिस ला जवळ जवळ १५ ते १८ वर्षे काढली अन येथे आल्यावर मी अशीच प्रचंड निराश झाले घरी अन्न पाणी जाईना, सेक्शन मध्ये नुसते मख्खा सारखी बसून राहायची यांत्रिक पणे काम करायची तेव्हा माझ्या कडे व्यसनी शिपाईण तिचा ऍबेसेन्ट ते लिव्ह चा अर्ज तयार करून द्यायचा होता मी सेक्शन नवीन होते तिने मला गाठले अर्ज माझ्या कडून तयार करून घेतला आणि असिस्टंट डीन मॅडम कडे ठेवला. असिस्टंट डीन बाई पारशी होत्या अन चाणाक्ष हि, ! त्यांनी विचारले कोणा कडून अर्ज तयार करून घेतला तिने माझे नाव सांगितले मग असिस्टंट डीन बाईंनी मला तिच्याच बरोबर बोलावण्याचे फर्मान धाडले, मी भीत भीत गेले, बानो मॅडम मे आय कम इन ? बानो मॅडम सणकली, अरे आख्खा मुंबई बोलता बॉंबे का मुंबई हुवा अब मै १९९५ मे रिटार्यड हो जायेगी मुहं मे बैठं गया बॉंबे तो तुम मराठी बाई लोग इंग्लिश मे पुच्छता मे आय कम इन ? आ आ ! इंग्लिश पिती है क्या तू ? बापरे आता हे काय नवीन, मग बानो मॅडम नी शांत पणे बसवून घेतले खरंतर माझ्या लेटर मधील इंग्लिश अक्षर शैली वर आणि भाषेवर खुश झाली होती पण रागात त्या व्यसनी शिपाईणीला म्हणाली अभी ये नयी बाई को पकडा क्या ? मला म्हणाली देख डीकरी, ये पहले लिव्ह अप्लिकेशन बनायेगी फिर रोयेगी कि मुन्सिपाल्टी मेरो पगार नही दिया तो आप थोडा उधार दे दो ओर फिर गायब !

पुढे मला पारशी असिस्टंट डीन मॅडम नी दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, हमेशा चेहरा इधर खुश रखनेका ओर यहा सबको हेल्प करनेका लेकिन सरेंडर नहीं होने का ? नाहीं तो तेरा पगार क्या पुरी जायदाद इधर लगाओगी तो कम पडेगा ! समज ले कि चालीस मुलखो से पेशंट परेल मे आते है !

मग विषय झाला माझ्या निराशपणा बद्दल ती म्हणाली मै अग्यारी के सामने रोज प्रार्थना करके इधर आके बैठती है तू नजदिक के महालक्ष्मी मंदिर मे जाके आजा ! पुढे तिने मला श्री, पद्मावती अन महालक्ष्मी ची स्टोरी सांगून थक्क करून सोडले, पुढे अभिमानाने म्हणाली कि जो पती घर छोड आयी, पर उसके भक्त आज भी मानते है कि अपने को धनवान बनायेगी तो ये !

मॅडम मला म्हणाल्या हे आहे ह्या महालक्ष्मी दर्शनाचे मूळ अन तेव्हा पासून म्हणजे १९९३ ते २०१३ जवळ जवळ २१ वर्षे मी नेहमी दर्शन घेत आले. आपल्या जीवनात आनंद आहेच पण समजा नसला तरी आपण दुसऱ्यांना आनंद द्यावा !

मॅडम चा अनुभव अन असिस्टंट पारशी बाई ची कथा ऐकून, मन शांतपणे काम करू लागले अन जणू येथील प्रत्येकाला माझा एक आनंदी चेहरा बघायला मिळेल ह्याचा प्रयत्न करू लागले आणि हाच ह्या दर्शन कथेचा बोध !

© रविंद्र गांगल

(पोस्ट चा बहुतेक भाग मिळालेल्या माहिती वर तसेच बराचसा काल्पनिक आहे, एखाद्या व्यक्ती / संस्थे अथवा क्षेत्रा बद्दल समयोचित कौतुक आणि आकलन आवश्यक आहे तसेच आपल्या प्रतिक्रिया, सूचना, कौतुक आणि टीका ह्यातुन आणखीन काही शिकायला मिळेल ह्या अपेक्षेने हा खटाटोप!) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

Displayed at FB on 24th March 2019

No comments:

Post a Comment