👇🏼 सूर्यास्ताला ती म्हणाली
मन गहिवरले मन ओथंबून आले.
तो आधिकचं गुलाबी होत होत होता अन् मन मोकळे झाले.
मी विचारले तिला, अग चालला तो....
म्हणाली
"जाऊ दे त्याला
दिवसभर काबाडकष्ट करून तो आता मायेने गुलाबी झालाय,
क्षण दोन क्षितिजावर शांत होईल सागरा त....
परत प्रेम करेल निमिषार्धात गुलाबी मायेने माझ्या मुलाबाळावर तिकडे जी क्षितिजावर त्याची वाट पाहत आहेत.
तो इथे सुद्धा आमच्या प्रेमाच्या तुकड्याला नेमून गेला आहे...
तो येईल क्षणभरात इथे क्षितिजावर शांत प्रेमळ चंदेरी प्रकाश घेऊन
दिवसभराच्या श्रमा नंतर, आमच्या तुकड्याचे दोन क्षण शांत दर्शन झाले तरी माझी लेकुरवाळी खुश होतात..
कवी लिहितात
प्रेमी कुंजन करू लागतात
प्राणी पक्षी आपल्या निवाऱ्यात मायेचा वर्षाव करतात
आमच्या तुकड्यांच्या सारखे बस सारे लेकुरवाळे व्हावे
एवढीच आहे इच्छा !"
© रविंद्र गांगल
(“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)
Displayed at FB on 9th April 2019

No comments:
Post a Comment