त्यांच्या माणुसकीला सलाम !
काल हे सारे आठवले कारण काल परत तीच गाडी होती…
माझ्या आठवणीप्रमाणे ती तारीख दहा ऑगस्ट, २०१७, होती .....................
मी १२१६३ दादर चेन्नई गाडीचा, मेल एक्सप्रेस गार्ड म्हणून ताबा घेत होतो.
आणि पहिले........................
एक साधारणतः लमाणी स्त्रिया घालतात तसा वेष घातलेली खेडवळ, बरेचसे
मळखाऊ कपडे असलेली स्त्री लगेज / पार्सल कंपार्टमेंट मध्ये चढून कंपार्टमेंट
वॉल लागलेली नवी कोरी लेडीज सायकल हाताळत होती ......... थोडी नीट करत होती
पडणार नाही असे बघून परत स्टॅन्ड ला लावून बघत होती ................
मी थोडेसे उत्सुकतेने आणि थोडे अधिकाराने हटकले, आणि म्हंटले " ओ बाई सायकल ला का हात लावता ? " ती बाई म्हणाली “सायकल माझ्या मुलीची आहे................” तो मी थोडा गडबडलो ........... कारण मेल एक्सप्रेस काम करत असताना कधी कधी माणसाच्या कपड्यावरून त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज येत नाही हे मला एव्हाना सहा वर्षे काम करून लक्षात आले होते.
पण……………… बाई निःसंशय गरीब घरची आहे हे कळत होते.
बाई अजीजीने म्हणाली, “ साहेब चुकले, उतरते इथून पण दुसरे सामान सायकल वर
येणार नाही ना ?”
नवीन कोऱ्या सायकली वर कोणी मुद्दाम सामान / पार्सल लोड करत नाही पण वाटेवर
किती सामान कुठल्या स्टेशन ला येईल ह्याची खात्री नसते ................
तेवढ्यात एक मजूर म्हणाला कि "साहेब ! सायकल तिच्या मुलीचीच आहे" तेव्हड्यात ती बाई पण लेडीज कंपार्टमेंट मधून आपल्या मुलीला दाखवत होती. माझ्या आठवणी प्रमाणे मुलीचे नाव " प्रियांका मोरे"
मुलीच्या अंगावर पण, अंत्यंत साधे आणि जुने खेडवळ कपडे होते. मुलगी काहीशी निस्तेज
नुकतीच खूप मोठ्या तापातून उठलेली दिसत होती, सायकल हिच्याने स्टॅन्ड ला लावून ठेवता येईल पण चालवणे कठीण .......................
अर्थात हि सर्व उत्सुकता लगेच संपणार होती कि …………………….
हि साधारणतः तीन साडेतीन हजाराची नवी कोरी लेडीज सायकल ह्यांची कशी ?
चार्ज घेतला कम्पार्टमेन्टचा ! सायकल सोलापूर ला जाणार होती लगेज तिकीटावर !
सायकल, ती मुलगी आणि तिची आई .................
हे कोडे सोडवले .................कॉन्ट्रॅक्ट सुपरवायजर " संतोष यादव" ने, भांडुप ला डोंगरावर वस्तीत राहणारा संतोष यादव दादर पार्सल मध्ये लोडींग सुपरवायझर चे कॉन्ट्रॅक्ट वर कामाला होता.. आहे
साधारणतः पावणे सहा फूट उंचीचा यादव, चांगले मराठी बोलतो आणि म्हणाला .............
"साहेब ! ह्या सायकलचे लगेज तिकीट मी काढून दिले ............"
हा मला आणखीन एक धक्का होता....................... तो पुढे म्हणाला ....................
प्रियांका मोरे, एक गरीब पाड्यावरची सोलापूर जिल्ह्यातील मुलगी, वायरल इन्फेक्शन ने आजारी, मरणासन्न अवस्थेत मुंबईत आणली गेली आणि तिने जगायची आशा सोडून दिली होती. ................
शीव च्या (सायनच्या) लोकमान्य टिळक म्युन्सिपल हॉस्पिटल मध्ये लाईफ सपोर्ट वर ठेवली होती.
थोडी आयुष्याची दोरी बळकट होती, लाईफ सपोर्ट काढले पण मुलीला औषधउपचार जात होता पण अन्न घेत नव्हती आणि तिथे तिला देवदूता सारखी निवासी डॉक्टर मिळाली नाव बहुतेक " शैलजा एम "
तरुण निवासी डॉक्टर ने त्या मुली मध्ये जान परत आणण्याचा शर्थीचा प्रयन्त केला.
प्रियंकाला खूप सपोर्ट दिला, टिळक हॉस्पिटल सारख्या ठिकाणी प्रचंड कामाच्या व्यापात
आणि अपुऱ्या पडणाऱ्या सोयी सुविधा मधून त्या डॉक्टर शैलजाने आपली जान फुकली पण
मुलगी अन्न घेईना , अन्नावरची वासना उडाली होती. डॉक्टर शैलजाने ने मुलीला हेरले आणि चक्क तू सायकल चालवू शकतेस आणि जेवशील खाशील तर सायकल देईन सांगितले आणि प्रियांका चक्क सायकल स्वप्नाने मोहित होऊन अन्न पाणी घेऊ लागली, ताकद आली आणि रुग्णालयातून जाण्याचा दिवस आला ................. डॉक्टर शैलजाने चक्क एक नवी कोरी लेडीज सायकल तिला देऊ केली ......
प्रियांका खुश, माय लेकी खुश !
सायकल, सायन हॉस्पिटल ते दादर टर्मिनस टॅक्सिने नेण्यासाठी नर्सिंग स्टाफ आणि हॉस्पिटल स्टाफ ने पैसे उभे केले .
प्रियांका आणि तिची आई, नव्या कोऱ्या सायकली सहित टॅक्सी ने दादर टर्मिनस ला पोहोचल्या
आणि सायकलच्या लगेज तिकिटाचा प्रश्न उभा राहिला ........................... हि सगळी कथा ऐकल्या
वर तो खर्च उचलला लोडींग सुपरवायजर " संतोष यादव" ने
आजारातून बरे केलेल्या आणि तिच्यात सायकल बक्षीस देऊन, जान फुकलेल्या, डॉक्टर शैलजा ला सलाम !
टॅक्सी आणि तिकिटाचे पैसे देणाऱ्या सायन हॉस्पिटलच्या नर्सिंग आणि सब स्टाफ ला सलाम !
सायकलच्या लगेज तिकिटाचे पैसे भरणाऱ्या, ( स्टोरी ऐकल्यावर मी देऊ केलेले पैसे विनम्र पणे नाकरून आभार मानणाऱ्या ) पार्सल ऑफिस मधील कॉन्ट्रॅक्ट लोडींग सुपरवायझर " संतोष यादव" ला सलाम !
त्यांच्या माणुसकीला सलाम !
( प्रसंगातील बहुतेक सर्व नावे माझ्या आठवणी प्रमाणे आणि केवळ काही मिनटात मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत, प्रवासी गाड्यावर तसेच माल गाड्यावर काम करताना असे विविध प्रकारचे प्रसंग मनात कोरले जातात आणि ते शक्यतो सेवानिवृत्ती नंतर लिहायचे असतात पण ह्या प्रसंगातील त्या डॉक्टर मॅडम शैलजा, नर्सिंग स्टाफ आणि तो संतोष यादव ह्याच्या वर तो अन्याय झाला असता, त्याचे कौतुक आज तीन महिन्यांनी का होईना होणे आवश्यक आहे म्हणून हा खटाटोप) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)
Displayed at FB on 21 November 2017
No comments:
Post a Comment