पारिजातक
पारिजातकाच्या अवर्णनीय प्रेमासारखीच ती प्रेम करत होती त्याचावर.....
कर्तव्यनिष्ठपणे बांधावर निश्चल उभी होती, मायेने ओथंबलेली अन् जणू कृष्ण भक्तीत लीन झालेल्या राधे सारखी ....
उषःकाल होण्याच्या आधी जणू त्याच्यावर करायच्या प्रेमाच्या वर्षावा साठी आतुरलेली अन् त्याच्या आठवणीने डोळ्याच्या कडा ओल्या झाल्याने जणू दवबिंदू नी भारलेल्या प्राजक्ता सारखी आपले
विलोभनीय फुलासारखे निर्मळ मन त्याला बांधावरून अर्पण करणारी...
तिच्या त्या प्रेमाला नाजूक पांढऱ्या रंगाचा निर्मळ पणा होताच पण पाठी खंबीर रक्तवर्णी देठा सारखी भक्कम कर्तव्य बुद्धी होती..
मग त्याला जणू तिचे पारिजातकाच्या सुंदर सुगंधाने अन् भारलेल्या प्रेमाने लीन झालेले प्रेम, नाजुक फुलांच्या रूपाने मोहित करत होते.
© रविंद्र गांगल
( Displayed at FB on 12th March'2019)
No comments:
Post a Comment